Wednesday, October 22, 2014

सोसायटी अकाऊंटसमध्ये ३ कोटींचा घोटाळा the maharashtra co-operative housing society bye -laws

कांदिवलीमधल्या चारकोप येथील एका हाऊसिंग सोसायटी सेक्रेटरीच्या पतीने मनमानी कारभार करीत सोसायटीच्या अकाऊंटसमध्ये सुमारे ३ कोटींचा प्रचंड गैरव्यवहार करून सदस्यांची फसवणूक केली आहे. म्हाडाच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये एवढ्या मोठ्या रकमेचा घोटाळा उघड झाल्याची ही पहिलीच घटना असल्याची चर्चा आहे.

चारकोप सेक्टर-८ मधील प्लॉट क्र. १५ मध्ये जयनील को. ऑप हाऊसिंग सोसायटी आहे. या सोसायटीत ६३ सदस्य आहेत. २००२ पासून भावना शहा या सोसायटीच्या सेक्रेटरी पदावर आहेत. परंतु भावना यांच्याऐवजी त्यांचे पती हेमंत शहा हेच प्रत्यक्षात सर्व व्यवहार करीत आहेत. सोसायटीचे अकाऊंटसमध्ये योग्य त्या नोंदी न ठेवता मनमानी कारभार विविध प्रकारे त्यांनी सुमारे ३ कोटी रुपयांची अफरातफर केली आहे. कोणताही हिशेब देण्यास शहा वारंवार टाळाटाळ करीत असल्याने सदस्यांनी म्हाडाकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर सोसायटीवर प्रशासक नेमण्यात येऊन चौकशी सुरू करण्यात आली.

म्हाडाच्या प्रशासकांनी सोसायटीच्या लेखापरिक्षण अहवालात गैरव्यवहारांबाबत गंभीर ताशेरे ओढले आहेत. सदस्यांच्या मंजुरीविना ३ दुकाने बांधून त्यांची परस्पर विक्री करणे, सभासदांची ट्रान्सफर फी अकाऊंटसमध्ये न दाखविणे, पाकिर्ंगच्या नावाखाली जागा विकून पैसे जमा न करणे, संस्थेच्या नावावर बँकेत असलेली ९ लाख १५ हजारांची रक्कम पदाधिकाऱ्यांच्या मंजुरीविना वापरणे, कॉन्ट्रॅक्टरने बिल न देताही त्याला मोठ्या रकमा देणे असे अनेक आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. बिल्डींगच्या गच्चीवर पेंटहाऊस बांधून ते शहा यांनी आपल्या नावावर करून घेतले आहे. याशिवाय २० लाख रुपयांच्या बँक एफडीचाही हिशेब मिळत नसल्याचे सदस्यांनी सांगितले.

सर्व आक्षेपांचा विचार करता ही रक्कम सुमारे तीन कोटींच्या घरात जात असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. शहा यांच्या गैरव्यवहारांबाबत चारकोप पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. म्हाडाने सहकारी संस्था कायद्यातील कलम ८३ नुसार कारवाई सुरू केलेल्या कारवाईची प्रक्रिया पूर्ण करण्यातही दिरंगाई होेत आहे. 



housing society act mumbai

list of housing society in mumbai

bye laws of cooperative housing society mumbai pdf

bylaws of cooperative housing society mumbai download

cooperative housing society bye laws download

model bylaws of cooperative housing society

cooperative housing society

bye-laws of the co-operative housing societies

No comments:

Post a Comment