कामकाज हाऊसिंग सोसायटीचे! Co-operative Housing Society By-laws
जोपर्यंत हाऊसिंग सोसायटीच्या कामकाजाचा मूळ गाभाच एखाद्याला समजत नाही तोपर्यंत ती व्यक्ती सोसायटीचे कामकाज नीट पाहू शकत नाही. म्हणून अधिकाधिक हाऊसिंग सोसायटींमध्ये भांडणे, तक्रारी आणि कोर्टकचेऱ्या होण्याचे प्रकार घडतात. हे टाळण्यासाठी काही महत्त्ववपुर्ण बाबींचा घेतलेला आढावा.
........
गृहनिर्माण सोसायटी हा विषय प्रत्येकाने समजून घेणे आवश्यक असते. जोपर्यंत हाऊसिंग सोसायटीच्या कामकाजाचा मूळ गाभाच एखाद्याला समजत नाही तोपर्यंत ती व्यक्ती सोसायटीचे कामकाज नीट पाहू शकत नाही. म्हणून अधिकाधिक हौसिंग सोसायटींमध्ये भांडणे, तक्रारी आणि कोर्टकचेऱ्या होण्याचे प्रकार घडतात. हे टाळण्यासाठी काही महत्त्ववपुर्ण बाबींचा घेतलेला आढावा.
सोसायटीमध्ये महत्त्वाचे मुद्दे अनेक आहेत. त्यापैकी सभासदाने मासिक हप्त्यासंबंधी कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती मिळणे महत्त्वाचे आहे. एकदा सोसायटीने दरमहा ठरविलेला हप्ता प्रत्येक महिन्याच्या सुरूवातीच्या काळात ठरविलेल्या तारखेअगोदर भरणे प्रत्येक सभासदांचे आद्य कर्तव्य आहे. सोसायटीचा सर्व व्यवहार सदस्यांच्या वर्गणीवर अवलंबून असतो. जर एखाद्या सदस्याने ही रक्कम वेळेत भरली नाही तर सोसायटीला अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. उदा. मेंटेनन्सचे पैसे दिले नाहीत तर सोसायटीची स्वच्छता, इलेक्ट्रिसिटी, ड्रेनेज तसेच इतर तत्सम कामे वेळेत होऊ शकणार नाहीत. त्यासाठी मेंटेनन्स वेळेवर भरावे. जर एखाद्या सदस्याने ते देण्याचे टाळले तर मात्र त्याच्यावर कार्यवाही केल्याचे प्रयोजन सोसायटी 'बाय लॉ'मध्ये दिलेले आहे. अशा हप्तेचुकार सदस्यावर जास्तीत जास्त द.सा.द.शे. २१ टक्के किंवा त्यापेक्षा कमी व्याज आकारता येते. बाय-लॉमधील पोट नियम ७२ प्रमाणे ठराव पास करून योग्य आकारणी ठरवावी. फार काळ थकबाकी न भरणाऱ्या व कोणत्याही कारणास्तव टाळाटाळ करणाऱ्या सभासदांची नोंद हप्ते बुडविणारा (डीफॉल्टर) म्हणून होऊ शकते व तशी नोंद होणेदेखील भविष्यकाळात घातक ठरू शकते. यापूवीर् ज्या ज्या सोसायट्यांच्या सदस्यांनी आपले मेंटेनन्स देण्याचे टाळलेले आहे अशांवर आपले घर लिलाव करण्यापर्यंत पाळी आलेली आहे. ज्या सदस्याने मेंटेनन्स भरण्यास अगदीच टोकाची भूमिका घेतली असेल तर त्याला पो. नि. ७० प्रमाणे मागणीची नोटीस पाठवावी. परंतु ही नोटीस जर त्याने घेण्याचे टाळले तर मात्र त्याला एक-दोन वेळा पत्र लिहून त्याची कल्पना द्यावी. व पैशाविषयी विचारणा करावी. सभासदाकडून पत्रास उत्तर दिले नाही तर मात्र (सेक्शन) कलम १०१ नुसार त्याच्यावर कारवाई करावी. यासंबंधी जिल्हा फेडरेशनच्या कार्यालयात माहिती मिळू शकते.
सोसायटीचा मालमत्ता कर
सोसायटीची नोंदणी झाल्यावर मालमत्ता करासंबंधी सेक्रेटरीने जागरूक राहून सुरूवातीपासूनच नगरपालिका/महानगरपालिका यांच्या कार्यालयात जाऊन मालमत्ता करासंबंधी चौकशी करणे कधीही योग्य ठरणारे असते. कारण या करासंबंधी गाफील राहून चालणार नाही.
नगरपालिका आपल्या मालमत्ता करासंबंधी नेहमीच वसुलीचा दट्टा उगारत असते. दरवषीर् मालमत्ताकर वर्षाअगोदर वसूल करण्याचा पालिकेचा नियम असतो व त्याची नोटीस वेळेवर देणेदेखील आवश्यक असते. त्यासाठी त्यांच्या नोटीशीची वाट न पाहता सोसायटीच्या सेक्रेटरीने स्वत: पुढाकार घेऊन प्रत्येक फ्लॅटवर आकारल्या जाणाऱ्या कराची माहिती गोळा करावी व त्याप्रमाणे मासिक हप्त्यांमध्ये अंदाजे रक्कम ठरवून सभासदांकडून दरमहा जमा करावी. ही रक्कम पालिकेत भरण्यासाठी पालिकेकडे चौकशी करून बिल मागवून घ्यावे व १५ दिवसांच्या मुदतीचा फायदा घेऊन कर भरून टाकावा. काही पालिका प्रत्येक फ्लॅटधारकांकडून 'डायरेक्ट' कर वसुली करतात व फ्लॅटधारकाच्या नावाने त्याची पावतीदेखील देतात. अशी वसुली सोसायटीच्या कामकाजासाठी फायद्याची ठरते. कारण सोसायटी एका जबाबदारीतून मुक्त होते. मात्र हा नियम सर्व सभासदांसाठी एकच राहील याची खबरदारी घ्यावी.
मालमत्ता कर आकारण्याची पध्दती वेगवेगळी असली तरी 'कर' हा भरावाच लागतो. हा कर जर कोणत्याही सदस्याने भरण्याचे टाळल्यास संपूर्ण इमारतीचा लिलाव करण्याचा अधिकार पालिकेकडे असतो. मुंबईत अशा प्रकारचे लिलाव झालेले आहेत. आपल्याला माहीत नाही, आम्हाला कोणी सांगितले नाही, आम्ही त्याला जबाबदार कसे असे प्रश्न विचारण्याला पालिका जबाब देत नाही. तरी पहिल्यापासून सतर्क राहून आपला मालमत्ता कर भरावा.
housing society act mumbai
list of housing society in mumbai
bye laws of cooperative housing society mumbai pdf
bylaws of cooperative housing society mumbai download
cooperative housing society bye laws download
model bylaws of cooperative housing society
cooperative housing society
bye-laws of the co-operative housing societies
No comments:
Post a Comment