भाडेकरूंकडून घराचा वापर नीट न होणे... भाडेकरू घराचा ताबा न सोडण्याची भीती... करार संपल्यावर नवा भाडेकरू शोधण्यासाठी वणवण व खर्च... कायदेशीर कटकटी... अशा अनेक कारणांमुळे अनेकांना घर भाड्याने देण्यापेक्षा तसेच मोकळे ठेवणे सोयीचे वाटते. परंतु , योग्य मार्गाने विचार करत गेल्यास भाडेकरू ठेवणे सोयीचे आणि विनासायास होऊ शकते.
...........
* घर भाड्याने कसे द्यावे ?
सर्वप्रथम , तुमचे घर भाड्याने द्यायचे आहे , याची जाहिरात करा. किरकोळ पैसे देऊन तशी जाहिरात स्थानिक वृत्तपत्रांत करता येईल किंवा ' मॅजिकब्रिक्स.कॉम ' अशा रिअल इस्टेट वेबसाइट व ' ओएलक्स.इन ' याप्रमाणे मार्केट पोर्टलवर झळकवता येईल. परंतु , रिअल इस्टेट ब्रोकरची मदत घेतल्यास यामुळे वेळ व खटपट वाचू शकेल. संभाव्य भाडेकरू शोधण्यासाठी आणि तुमच्या मालमत्तेला किती भाडे मिळू शकते , याची नेमकी माहिती मिळवण्यासाठी ब्रोकरची मदत होईल. ब्रोकर साधारणतः एका महिन्याचे भाडे सर्व्हिस फी म्हणून घेतात. भाडेकरूची पोलिसांकडून चाचपणी करण्यासाठी आणि लीज अॅग्रिमेंटची नोंदणी करण्यासाठीही ब्रोकर कामास येतात. लीजचा कालावधी ११ महिन्यांहून अधिक असेल तर अॅग्रिमेंटची नोंदणी करणे सक्तीचे असते.
भाडेकरूंकडून काही नुकसान झाल्यास ते भरून निघावे म्हणून ' सिक्युरिटी डिपॉझिट ' आकारणे योग्य ठरते. भाडेकरूने मालमत्तेचा वापर चांगला केल्यास ते परत करता येऊ शकते नंतर.
लीज अॅग्रिमेंट तयार करण्यासाठी कायदेशीर सल्ला घेता येईल. यामध्ये कराराचा कालावधी , देखभाल खर्च , मासिक भाडे , डिपॉझिटची रक्कम , घर वा फर्निचरचे नुकसान झाल्यास भरपाईची रक्कम यांचा समावेश असतो. या करारावर दोन्ही पक्षांची सही असते. भाडेकरूला करार पटला नसल्यास तो त्यात बदल सुचवू शकतो.
भाडेकरू निश्चित झाल्यावर पोलिस व्हेरिफिकेशन करणे आता सक्तीचे केले आहे. भाडेकरूच्या ओळखीचा पुरावा , पॅन कार्ड , पत्त्याचा पुरावा , नोकरी-व्यवसायाचा पुरावा आणि कराराची प्रत पोलिसांकडे द्यावी लागते. संबंधित भाडेकरूची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीये ना , याची खातरजमा पोलिस करतात.
* भाडे कसे ठरवावे ?
कोणत्याही मालमत्तेचे भाडे म्हणजे विविध घटकांची बेरिज असते. त्यातील महिला घटक असतो तो मालमत्तेचे मूळ भाडे. ते वार्षिक भांडवली मूल्याच्या अंदाजे २.५ ते ३ टक्के असते आणि घराच्या ठिकाणानुसार बदलत जाते. दुसरा घटक म्हणजे , घरामध्ये भाडेकरूला दिलेल्या सुविधा. चांगले फर्निचर , फिक्चर व सुंदर रंगकाम केलेले घर नक्की अधिक भाडे मिळवून देईल. मोड्युलर किचन , लॉन , टेरेस असेल तर भाड्याची रक्कम आणखी वाढेल. किमान प्राथमिक सुविधा तरी असाव्यात , अशी भाडेकरूची अपेक्षा असते. सोसायटीकडून घरमालकाला आकारली जाणारी देखभाल फीसुद्धा विचारात घ्यावी लागते. जिम , स्वीमिंग पूल , अन्य सुविधांमुळे ती जास्त असेल तर त्यातला काही भाग भाडेकरूकडून घेता येऊ शकतो. चौथा घटक म्हणजे , तुमची निवासी मालमत्ता बिझनेस हबच्या बाजूला असेल आणि पुरवठा कमी असल्याने मागणी जास्त असेल तर भाडे भरपूर आकारले जाते.
* हौसिंग सोसायटी मालकाचा निर्णय डावलू शकते का ?
आपला फ्लॅट भाड्याने देण्याचा अधिकार मालकाला असला तरी हौसिंग सोसायटीलाही यात पडता येते. कायद्यांचा दाखला देऊन या एकट्या सोसायट्या भाडेकरू ठेवणे कायदेशीर नाकारू शकतात. पण त्यांना असे करण्याचा घटनात्मक अधिकार नसतो.
व्यक्तीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी व वैवाहिक दर्जावरून हौसिंग सोसायट्या भाडेकरू नाकारू शकत असल्या तरी त्यास कोर्टात आव्हान देता येते. आपले घर भाड्याने दिलेल्या मालकाकडून जास्त देखभाल फी आकारण्याची मुभा सोसायट्यांना सोसायटीज अॅक्टने दिली आहे.
No comments:
Post a Comment