हाऊसिंग सोसायटी the maharashtra co-operative housing society bye -laws
आमची
सोसायटी भाडे तत्वावर जागा देणाऱ्या सभासदांकडून वारंवार वाढीव दराने बिन
भोगवटा शुल्क वसूल करीत आहे. बिन भोगवटा शुल्काबाबतचा ऑगस्ट २००१ मध्ये
काढण्यात आलेला सरकारी आदेश मी सोसायटीस सादर केला आहे. पण सोसायटीने जर तो
बहुमताने फेटाळला तर काय करावे आणि ऑगस्ट २००१ नंतर भरलेल्या वाढीव बिन
भोगवटा शुल्काचा परतावा मिळू शकतो का?
- एक वाचक, डोंबिवली.
उत्तर - सोसायटीने अर्ज फेटाळल्यास उप निबंधकाकडे तक्रार करावी. बिन भोगवटा शुल्काबाबतचा आदेश सरकारी असल्याने त्याची अंमलबजावणी करण्याचे काम उपनिबंधकाकडे आहे. तसेच सोसायटीला सर्वसाधारण सभेत अर्ज फेटाळता येणार नाही. वाढीव बिन भोगवटा शुल्काचा परतावा मिळविण्यासाठी एक अर्ज आणि एक मागणी अर्ज सोसायटीला सादर करावा. त्यात जास्तीची रक्कम परत करण्यासंदर्भातील हिशेब लिहून कळवावा. त्याकडे सोसायटीने दुर्लक्ष केल्यास तेच मागणीपत्र उप-निबंधकाकडे सादर करावे. उपनिबंधक त्याची वसूली करून देऊ शकतात.
ब्लड रिलेशनमध्ये व्यवहार झाला असेल आणि तो व्यवहार सेल अॅग्रीमेन्ट असेल तर हस्तांतरण शुल्क माफ होते का? माफ होत नसेल तर संस्थेला झालेल्या नुकसानीस कोण जबाबदार? आणि जर तो व्यवहार गिफ्ट डीड असेल तर कोणत्या कलमानुसार हस्तांतरण शुल्क भरावे लागत नाही?
संजय शिंदे, सानपाडा
उत्तर - ब्लड रिलेशनमध्ये व्यवहार झाला असेल तर हस्तांतरण शुल्क घ्यावे असा सरकारी अध्यादेशात कुठेही उल्लेख अथवा नोंद नाही. तो व्यवहार सेल डीड असो, गिफ्ट डीड असो अथवा दान केलेला असो - नातेवाईकांमध्ये (ब्लड रिलेशन) व्यवहार झाला असेल तर हस्तांतरण शुल्क द्यावे लागत नाही. संस्था नोंदणी ही फ्लॅट बदली करण्यासाठी होत नसते त्यामुळे संस्थेचे नुकसान होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एक सभासद दुसऱ्या सभासदाला फ्ॅलट विकतो तेव्हा त्या एक्सचेंज डीड मध्येही हस्तांतरण शुल्क भरावे लागत नाही.
बिल्डरकडून अ व्यक्तीने फ्लॅट घेतला आणि तो ब व्यक्तीला विकला. आता आम्ही ब व्यक्तीकडून तो फ्लॅट विकत घेत आहोत. मात्र अ आणि ब व्यक्तींकडील मूळ करार पत्र हरवली आहेत. पत्र हरवल्याच्या एफआयआरची कॉपी, निबंधकाकडून घेतलेली सत्य प्रत आणि वृत्तपत्रात नोटीस दिल्याची प्रत जोडूनही बॅंक होम लोन नाकारत आहे. ब व्यक्तीशी केलेल्या करारानुसार आम्ही पंचेचाळीस दिवसात पैसे देऊ शकलो नाही तर करार रद्द होऊ शकतो का?
- रविराज, मुंबई
उत्तर - कुठल्याही बॅंकेला आपण जाब विचारू शकत नाही. ते कर्ज देणार असल्याने ते मागतील ती कागदपत्रे द्यायला हवीत. परंतु ते शक्य नसेल तर दुसऱ्या बॅंकेकडे जावे. बॅंकच पाहिजे असे नाही. आजकाल बऱ्यास हाउसिंग फायनान्स कंपन्या कर्ज देतात. पैसे उभारण्याची जबाबदारी बॅंकेची नसल्याने ते कर्ज नाकारू शकतात. अशावेळी इतर बॅंका किंवा फायनान्स कंपन्यांचा पर्याय शोधावा.
सहकारी गृहनिर्माण सोसायटीतील ब्लॉक मुलाच्या नावे केल्यानंतर शेअर सटिर्फिकेटवर मुलाचे नाव नोंदवले नव्हते तसेच करारपत्र आणि स्टॅप ड्युटीही दिलेली नव्हती. आता माझ्या मुलाने दुसरीकडे स्वत:चा फ्लॅट घेतला असून आधीचा फ्लॅट सोसायटीने कुणाच्या नावे करणे आवश्यक आहे?
- सी.चंद दत्तात्रय, वांदे
उत्तर - आधीचा फ्लॅट आई किंवा वडीलांनी पुन्हा आपल्या नावावर करून घ्यावा अन्यथा नातेवाईकांपैकीच कुणा एकाच्या नावे करावा. मात्र कुणाच्याही नावे केला तर मुदांक शुल्क भरावे लागेल. नातेवाइकांमध्येच व्यवहार केल्यास फक्त हस्तांतरण शुल्क भरावे लागणार नाही. पण मुदांक भरावा लागेल.
housing society act mumbai
list of housing society in mumbai
bye laws of cooperative housing society mumbai pdf
bylaws of cooperative housing society mumbai download
cooperative housing society bye laws download
model bylaws of cooperative housing society
cooperative housing society
bye-laws of the co-operative housing societies

No comments:
Post a Comment