माळ /जपमाळ ……….
उत्तर किंवा पूर्वेकडे मुख करून बसावे. तरच फळ मिळते. दक्षिण किंवा पश्चिमेस मुख करू नये. स्फटीक मालेने जप केल्यास साम्राज्य, पुत्रजीवेने उत्कृष्ट लक्ष्मी, दर्भास गांठी मारून केलेल्या माळेने आत्मज्ञान, रुद्राक्ष माळेने सकलकामना पूर्ती, प्रवाळाच्या माळेने सर्वलोकवश होतात. आंवळ्याची माळ मोक्षप्रद असून मोत्यांची माळ सर्वविद्या देते. माणिकाची त्रैलोक्यास वश करते तर नीलाची किंवा मरकताची शत्रूस भय उत्पन्न करते. सुवर्णाची महाऐश्वर्य देते. रुप्याची माळ कन्येची प्राप्ती करून देते, पारदाची सर्व अर्थ प्राप्त करून देते. माळेत सर्वांत उत्तमोत्तम १०८ मण्यांची, १०० मण्यांची उत्तम, ५४ मण्यांची अथवा २५ ची अधम. या शिवाय २८ पासून १०० मण्यांपर्यंत करतात, त्यास आधार नाही असे म्हटले आहे.
जपमाळेचे प्रकार:
हातात धरून ज्या माळेचा जप केला जातो तिला करमाळा म्हणतात. ह्या जपमाळेतील मणी हे त्या विशिष्ट दैवताला आकर्षित करून घेण्याची ताकद ठेवतात. ह्या जपमाळेतील मणी म्हणजेच प्रत्येक एका विशिष्ट वैश्विक शक्तीला जागृत करण्याचा मार्ग आहे. त्यामुळे आपले नामस्मरणचे अंतिम उद्दिष्ट जाणून आणि गुरूंच्या आज्ञेने विशिष्ठ जपमाळेच्या सहाय्याने जप करावा आणि त्या वैश्विक शक्तीचा आशिष प्राप्त करून घ्यावा.
1. कमलाक्ष माळ :
कमळ पुष्पं जे मुलतः पवित्रता आणि उत्पत्तीचे प्रतिक आहे, हे माता लक्ष्मीचे अति प्रिय पुष्पं आहे, त्यामुळे तिला कमला असाही संभोधतात. ह्याच मुळे लक्ष्मी देवीची साधना करताना कमळाच्या सुकलेल्या बियांपासून बनवलेल्या, कमलाक्ष जपमाळेचे अधिक महत्व आहे. ह्या माळेच्या आणि मंत्राच्या नियमित जपामुळे धन, भाग्य, सुख संतुष्टी ह्यांची प्राप्ती होऊ शकते.
2. तुळशी माळ :
भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुळशीची माळ हि भगवान विष्णू, राम आणि कृष्ण ह्या देवतांच्या नामजपासाठी वापरतात. तुळशीला आयुर्वेदातातही अधिक महत्व आहे. तसेच तुळशी माळेच आध्यात्मिक उन्नतीसाठीही उपयोग होतो.
3. रुद्राक्ष माळ :
रुद्राक्षापासून बनवलेली माळ ही भगवान शिव ह्यांच्या उपासनेस उत्तम असते. शिवपंथी हि मला तपस्येसाठी वापरतात. रुद्राक्ष वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध होतो उदा.एक ते चौदा मुखी रुद्राक्ष उपलब्ध आहेत पण पंचमुखी रुद्राक्ष अधिकतम वापरला जातो.
4. चंदन माळ:
चंदनाच्या लाकडापासून बनवलेली हि माळा दोन रंगात येतात. पांढर्या रंगात आणि रक्तचन्दनापासून बनवलेली माळ लाल रंगात येते. पांढर्या चंदनाची माळ हि भगवान विष्णू, राम आणि कृष्ण उपासनेसाठी उत्तम आहे. ह्या माळेच्या नियमित वापराने शांती प्राप्त होऊन समृद्धीचे द्वार खुले होतात. आणि रक्तचंदनापासून बनवलेली माळ हि श्री गजाननाच्या उपासनेसाठी उत्तम मानली जाते.
5. स्फटिक माळ :
स्फटिक मूलतः थंड असते त्यामुळे स्फटिक माळेचा जप मनशांती देणारा असतो. देवीचा जप करताना ह्या माळेचा विशेष उपयोग होतो. ह्या माळेच्या नित्य जपाने शीलसंवर्धानास सहाय्य होते.
6. पुत्र जीवी माळ :
पुत्राजीव वृक्षापासून बनवलेल्या ह्या माळेमुळे पुत्ररत्न प्राप्ती होते. ह्यालाच पुत्रवंती माळा असेही म्हणतात.

No comments:
Post a Comment