Friday, April 22, 2016

Information of rudraksha in marathi

रूद्राक्ष माहिती (अवश्य वाचा व सर्वानीच रूद्राक्ष धारण करवे)

जे रडणार्‍याकडून त्याचे दुःख घेण्याची आणि त्याला सुख देण्याची क्षमता असलेल रुद्र ± अक्ष’ या दोन शब्दांपासून रुद्राक्ष हा शब्द बनला आहे.

अ. अक्ष म्हणजे डोळा. रुद्र ± अक्ष म्हणजे जो सर्व पाहू आणि करू शकतो, (उदा. तिसरा डोळा) तो रुद्राक्ष. अक्ष म्हणजे आस. डोळा एकाच अक्षाभोवती फिरतो; म्हणून त्यालाही अक्ष म्हणतात.

आ. रुद्र म्हणजे रडका. ‘अ’ म्हणजे घेणे आणि ‘क्ष’ म्हणजे देणे; म्हणून अक्ष म्हणजे घेण्याची किंवा देण्याची क्षमता.

 रुद्रवृक्ष (रुधिरवृक्ष, रुद्राक्षवृक्ष)

अ. रुद्रवृक्ष निर्माण होण्याचे पौराणिक विवेचन

तारकापुत्र अधर्माचरण करू लागल्याने विषादाने शंकराच्या नेत्रांतून पडलेल्या अश्रूंचे ‘रुद्राक्षवृक्ष’ होणे आणि शिवाने तारकापुत्रांचा नाश करणे

तडिन्माली, तारकाक्ष आणि कमलाक्ष या तारकापुत्रांनी धर्माचरण अन् शिवभक्ती करून देवत्व प्राप्त करून घेतले. काही कालावधीनंतर ते अधर्माचरण करत असल्याचे पाहून शंकर विषादग्रस्त झाला. त्याचे नेत्र अश्रूंनी डबडबले. त्याच्या नेत्रांतील चार अश्रूबिंदू पृथ्वीवर पडले. त्या अश्रूंपासून बनलेल्या वृक्षांना ‘रुद्राक्षवृक्ष’ म्हणतात. त्या चार वृक्षांपासून तांबडे, काळे, पिवळे आणि पांढरे रुद्राक्ष निर्माण झाले. नंतर शिवाने तारकापुत्रांचा नाश केला.’

शास्त्रत उल्लेख

देवीभागवत ,शिवलीलामृत ,शिवपुराण ,स्कंदपुराण,पूरश्र्चरण - चंद्रिका,उमाम्हेश्र्वर तंत्र इत्यादी ग्रंथातून रुद्रक्षाचे विस्तुत वर्णन आढळते. याशिवाय रुद्राक्षजाबालोपनिषद नावाचे उपनिषद केवळ रुद्राक्षाच्या विविध पैलूवर प्रकाशझोत टाकते, परंतु या सर्व ग्रंथांतून त्याची उत्पत्ती ,गुणधर्म,धारणविधी,उपचार पद्धती वैगेरे बाबतीत एकवाक्यता आढळत नाही आणि म्हणून नेमका कोणता ग्रंथ प्रमाणभूत मानावा असा अभ्यासकाच्या मनात संभ्रम निर्माण होतो.....

श्रीगुरू चरीत्र उल्लेख (आ. 33 वा)

श्रद्धेने किंवा श्रद्धा नसतानाही जो कोणी रुद्राक्ष धारण करतो. त्याला कोणतेही पाप लागत नाही. रुद्राक्ष धारण केल्याने मिळणारे पुण्य केवळ असीम आहे. त्या पुण्याला दुसरी उपमाच नाही. जो मनुष्य एक हजार रुद्राक्षांची माळ धारण करतो तो साक्षात रुद्र होतो. अशा माणसाला सर्व देव वंदन करतात. एक हजार रुद्राक्ष मिळू शकले नाहीत, तर एकशेआठ रुद्राक्षांची माळ गळ्यात धारण करावी. त्या माळेत नवरत्ने गुंफावीत.
रुद्राक्ष हे सर्वपापनाशक आहेत. ते हातांवर, दंडावर, मस्तकावर धारण करावेत. रुद्राक्षावर केलेला अभिषेक पूजेसमान फळ देणारा आहे. एकमुखी, पंचमुखी, एकादश-मुखी, चतुर्दशी असे विविध प्रकारचे रुद्राक्ष असतात. रुद्राक्ष खरे, अस्सल मिळाले तर उत्तमच. तसे मिळाले नाही तर कोणतेही रुद्राक्ष भक्तिभावाने धारण करावेत. त्यामुळे चतुर्विध पुरुषार्थाची प्राप्ती होते

रुद्राक्ष परीक्षा....

1. पूर्णपणे पिकलेले रुद्राक्ष कुठल्याही आकाराचे असले तरी पाण्यात टाकल्यावर बुडते. पाण्यामध्ये चटकन बुडणारे रुद्राक्ष हे अस्सल आहे याची खात्री बाळगायला हरकत नाही.जे पाण्यात डुंबत बुडेल ते खोटे, अथवा हलक्या दर्जाचे समजावे. २. रुद्राक्ष हे पाच -दहा मिनिटे तळहातात घट्ट दाबून धरले आणि नंतर हलवले तर त्यातून मंजुळ ध्वनी प्रतीत होतो. ३.तांब्याच्या २ भांड्यामध्ये व तांब्याच्या २ पटत्यांमध्ये रुद्राक्ष ठेवले असता अस्सल रुद्राक्ष लगेचच हालचाल दर्शवतो. ४. खरा रुद्राक्ष जसा तरंगत नाही तसा उकळत्या पाण्यात जर ६-८ तास ठेवला तरी त्याचे विघटन होत नाही. आणि रुद्राक्ष हे कुठल्याच बाजूने मोडत नाही  वाकत नाही. ५. अस्सल रुद्राक्ष बराच वेळ दुधात ठेवला तर दूध नासत नाही. ६.रुद्राक्ष हा प्रामुख्याने गोल असतो. तो दिसायला काटेरी पण ते काटे बोथट असतात, खडबडीत, त्याचे काठिण्य भरपूर असते.

रुद्राक्ष हे एका झाडाचे फळ आहे. रुद्राक्षाचा वृक्ष मध्यम उंचीचा असतो. हिमालयाच्या परिसरात नेपाळ, भूतान व केदारनाथ येथे हे वृक्ष आहेत. यांच्या फळांना रुद्राक्ष म्हणतात. झाडावर त्याच्यावर कवच असते. ते काढल्यावर आत जे बीज मिळते तो रुद्राक्ष. रुद्राक्षाचा अंगचे भोक असते, पण ते नीट साफ करून घ्यावे लागते. आतल्या काड्या वगैरे काढाव्या लागतात.

हा समुद्रसपाटीपासून तीन सहस्र मीटर उंचीवर किंवा तीन सहस्र मीटर खोल समुद्रात सापडतो. रुद्राक्षाची झाडे कपारीत वाढतात, सपाटीत वाढत नाहीत. याच्या झाडाची पाने चिंचेच्या किंवा गुंजेच्या पानासारखी; पण अधिक लांब असतात. त्याला वर्षाला एक ते दोन सहस्र फळे लागतात. हिमालयातील यती केवळ रुद्राक्षफळ खातात. याला अमृतफळ असेही म्हणतात. ते खाल्ल्यास तहान लागत नाही

रुद्राक्षमाला गळ्यात इत्यादी धारण करून केलेला जप रुद्राक्षमाला धारण न करता केलेल्या जपाच्या सहस्र पटीने लाभदायक असतो, तर रुद्राक्षाच्या माळेने केलेला जप इतर कोणत्याही प्रकारच्या माळेने केलेल्याच्या दहा सहस्र पट लाभदायक असतो; म्हणूनच रुद्राक्षमाळेने मंत्र जपल्याविना किंवा धारण केल्याविना शीघ्र (पूर्ण) मंत्रसिद्धी प्राप्त होत नाही, असे शैव समजतात. रुद्राक्षमाळेचा अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी ती गळ्याजवळ दोर्‍याने तिचा गळ्याला अधिकाधिक स्पर्श होईल अशी बांधावी.

आयुर्वेदाच्या मते रुद्राक्ष आम्ल, उष्णवीर्य व आयूकफनाषक आहे.त्याचा रक्तदाबाच्या (ब्लड प्रेशरच्या) रोग्याला उपयोग होतो असे म्हणतात रात्री तांब्याच्या भांड्यात रुद्राक्ष ठेवून भांडे भरून पाणी घालावयाचे आणि सकाळी रुद्राक्ष काढून ते पाणी प्यायले असता ब्लड प्रेशरवर उपयोग होतो असे म्हणतात. योगी लोकांच्या मते प्राणतत्त्व (किंवा विद्युत शक्ती) निमय करणारी शक्ती रुद्राक्षात (रुद्राक्ष मालेत) असते. रुद्राक्ष मालेने मंत्रसाधकाला मन:शक्तीवर नियंत्रण साधता येते.

रुद्राक्ष सर्व जाती, जमाती, स्त्रीपुरुष, मुले धारण करू शकतात. रुद्राक्षाची माला एकशेआठ रुद्राक्षांची असते. सत्तावीस मण्यांचीही माला गळ्यात घालतात. रुद्राक्ष धारण करणार्‍यांनी शुद्ध व पवित्र राहावे हे सांगायला नकोच. वळ्याएवढा, वजनदार, मजबूत व काटेदार रुद्राक्ष सतेज व उत्तम असतो, अस्सल उत्तम रुद्राक्ष पाण्यात बुडतो अशी त्याची परीक्षा ग्रंथात सांगितली आहे. त्याचप्रमाणे ग्रंथात असे सांगितले आहे की, दोन तांब्याच्या पात्रात रुद्राक्ष मधोमध ठेवला
असता तो स्वत:भोवती हळूहळू फिरतो. रुद्राक्षाला मुखे असतात. मुख म्हणजे रुद्राक्षाच्या वरच्या भोकापासून खाल पर्यंत गेलेली तरळ रेषा. रुद्राक्षावर काटे असतात. त्यामधून ही सरळ स्पष्टपणे खाली गेलेली असते. या सरळ खालपर्यंत गेलेल्या रेषेस मुख म्हणतात. रुद्राक्षावर अशा जितक्या रेषा असतील तितक्या मुखी तो रुद्राक्ष आहे असे समजतात. नदी समुद्राला मिळते तीही अशाच अनेक प्रवाहाने समुद्राला मिळते, त्याला न दीची मुखे म्हणतात. तशीच ही रुद्राशंची मुखे होत. सध्या मिळणारे रुद्राक्ष एक ते चौदा मुखांचे असतात.
रुद्राक्षाच्या मुखावर अस्पष्ट असा शिवलिंगासारखा आकार असतो, तो अत्यंत उत्तम रुद्राक्ष होय.

रुद्राक्षाचा मूळ भाग ब्रह्मा, नाळभाग ( छेद ) विष्णू व मुखभाग रुद्र आहे. तसेच रुद्राक्षात विद्यमान बिंदू ( काटे ) समस्त देवस्वरुप आहेत...कृमीने खाल्लेले, तुटलेले, काटे नसलेले, छिद्रयुक्‍त व अयोग्य रुद्राक्ष अशा प्रकारचे सहा रुद्राक्ष वापरणे योग्य नाही. रुद्राक्ष धारण करणार्‍या मनुष्याचे मद्य, मांस, लसुण, कांदा इत्यादी पदार्थांचे सेवन करु नये. सात्त्विक भोजन व शुद्ध दिनचर्या करावी . चित्तास ( मनास ) मिथ्या विषयांपासून व पापकर्मापासून दूर ठेवावे. शुद्ध विचार मनुष्याच्या मानसिक शांतीचे दाते आहेत . रुद्राक्ष-धारण सर्व मनोविकार दूर करुन परम शांती प्रदान करते.
अशा प्रकारे रुद्राक्ष धारण केल्यास सर्व अरिष्‍टे नाहीशी होतात.

रुद्राक्षाची वैशिष्ट्ये
१. जड (वजनदार) आणि सतेज
२. मुखे स्पष्ट असलेला
३. ॐ, शिवलिंग, स्वस्तिक इत्यादी शुभचिन्हे असलेला
४. मोठ्यात मोठा रुद्राक्ष आणि लहानात लहान शाळीग्राम उत्तम. (मेरुतंत्र)
५. कवेत मावणार नाही, एवढा बुंधा असलेल्या, म्हणजे जुन्या झाडाचा रुद्राक्ष
६. समुद्रसपाटीपासून अधिक उंचीवर असलेल्या झाडाचा रुद्राक्ष आणि एकाच झाडाच्या वरच्या फांद्यांतील रुद्राक्ष : उंचीवरच्या रुद्राक्षांना वरून येणारे सत्त्वगुण अधिक प्रमाणात मिळतात; म्हणून ते अधिक प्रभावशाली असतात.

७. पांढर्‍या रंगाचा सर्वांत चांगला. त्यापेक्षा कनिष्ठ रुद्राक्ष अनुक्रमे तांबडा, पिवळा आणि काळा रंग असलेले असतात. पांढरे आणि पिवळे रुद्राक्ष सहसा आढळत नाहीत. तांबडे आणि काळे रुद्राक्ष सर्वत्र आढळतात.

रुद्राक्षाच्या मुख्यपरत्वे त्याचे प्रकार आणि त्याची देवता व गुणधर्म यांविषयी .... 

१ मुखी. अत्यंत दुर्मिळ समजला जातो... महान योगीच हा धारण करतात. यामुळे षड्रीपुनवर विजय मिळवता येतो.सर्व मनोकामनापूर्ती होते. याची देवता परमात्मा शिव आहे. व धारण करणारा काहीच दिवसात विरक्त होतो.

२ मुखी.. हा अर्धनारी नटेश्वर चे प्रतीक आहे. हा धारण केला तर व्यक्तीमत्वात अमुलाग्र बदल होतो. धारणकर्त्याची कुण्डलिनी जागृत करण्याचा मार्ग सुलभ होतो. तो समोरच्या व्यक्तीला क्षणार्धात वश करू शकतो..पती पत्नी मधील ऐक्य, वैवाहिक सौख्य , दु:ख नाश, मनः शांती, उद्योगधंदा व प्रगती साठी हा धारण करतात

३ मुखी... अग्निदेवतेचे प्रतिक... हा धारण करणार्याला वाचा सिद्धी प्राप्त होते. तहान व भूकेवर विजय मिळवता येतो. बुद्धी कुशाग्र होते.

४ मुखी... ब्रम्हदेवचे प्रतीक.... याचा प्रभाव धारण कर्त्याच्या जिभेवर होतो.. अल्पावधीतच तो वक्ता साहेस्रेशू या पदविला पोहोचतो. स्मरणशक्ती तीव्र होते....

५ मुखी.. पंचानन शिवाचे प्रतीक. पंच महाभूतंचा यात समावेश होतो. धारणकर्त्याला मनःशांती प्रदान करतो. यात सर्व रुद्राक्षाचे गुण विद्यमान असतात. सर्वार्थाने उत्कृष्ट असतो. तरीही सहज उपलब्ध होतो म्हणून याकडे कोणीही लक्ष देत नाही. अन्य रुद्राक्षाकडेच आकर्षित होतात.

६ मुखी., कार्तिकेय स्वरूप. या वर माता पार्वती व माता लक्ष्मी ची सुद्धा कृपादृष्टी आहे. हा काही जण विष्णू स्वरूपही मानतात. व्यापारी लोक हा रुद्राक्ष वापरतात. या रुद्राक्षाने गल्ला कधीच रिकामा रहात नाही

७ मुखी... सप्त मातृका , अनंत नागाचे प्रतीक . माता सरस्वतीचा आशीर्वाद असतो. दीर्घायुष्य व अपघातपासून रक्षण करतो. याच्या धiरणाने मस्तकशूळ, संधीवात, विषमज्वर बरा होतो. सर्प दांवशiपासून रक्षण होते.

८ मुखी.. गणेशाचे प्रतीक.... याला चिंतामणी रुद्राक्ष सुद्धा म्हणतात.याला अष्टमातृका, त्रिदेवांचा आशीर्वाद लाभला आहे. तांत्रिक लोक याला कुण्डलिणीजागृतीचे साधन मानतात. हा जवळ असेल तर समायसूचकता अंगी बाळगते. अनेक कलामध्ये नैपुण्य येते.

९ मुखी... भैरवाचे प्रतीक.दुर्गेचा पूर्ण आशीर्वाद.हा रुद्राक्ष धारण करणार्याच्या आसपास दु:ख दैन्य दारिद्र्य कधीच फिरकत नाही.

१० मुखी..... यमराज चे प्रतीक.अष्टदीक्पाल चा आशीर्वाद. हा धारण केला तर तामसी शक्तिंपासून रक्षण होते. अनिष्ट ग्रह शांत होतात,

११ मुखी... ११ रुद्रांचे प्रतीक.,, इंद्राचे प्रतिकहि मानतात. हा अतिशय दुर्मिळ असून धारण कर्त्याचा अल्पावधीतच भाग्योदय होतो.

१२ मुखी….महाविष्णू तसेच १२ ज्योतिर्लिंगाचे प्रतीक. हा धारण केला असता व्यक्तिमत्व तेजपुंज होते. शत्रूघात व अपघातपासुन रक्षण होते.

१३ मुखी.. कामदेव स्वरूप...याला इंद्रiचा आशीर्वाद लाभला आहे.. हा श्रiध्याच्या वेळी धारण केला तर पितरांना सद्गती प्राप्त होते.

१४ मुखी... हनुमानाचे प्रतीक. हा शेंडीत धारण करतात. योग विद्येत नैपुण्य प्राप्त करण्यासाठी हा गळ्यात धारण करतात.

गौरी शंकर रुद्राक्ष... हे दोन रुद्राक्ष नैसर्गिक रित्या एकमेकांना चिकटलेले असतात, धारण कर्त्याला शिव-शिवाच्या अनुग्रहाने पूर्ण सुखशांती लाभते. हा धारण न करता देवघरात ठेवतात.

त्रिभुजी रुद्राक्ष...हा अतिशय दुर्मिळ समजला जातो. ३ रुद्राक्ष एकमेकांना चिकटलेले असतात. याला ब्रम्हा-विष्णू-महेशाचे प्रतीक समजले जाते....हा रुद्राक्ष धारण करर्त्याला काहीही कमी पडू देत नाही...

धारण विधान
शुक्ल पक्ष ...रविवार ,सोमवार ,बुधवार ,गुरुवार ,शुक्रवार ....द्वितीयेला ,पंचमी ,सप्तमी ,दशमी ,त्रयोदशी ,पौर्णिमा या तिथींना ....हस्त ,रोहिणी ,स्वाती , उत्तरा ,उत्तराषाढा उत्तराभाद्रपदा ,श्रवण ,धनिष्ठा इत्यादी नक्षत्रावर ....मेष ,कर्क ,तूळ ,मकर कुंभ लग्नावर रुद्राक्ष धारण करणे अधिक श्रेयस्कर ठरते ....
मेष -त्रिमुखी , वृषभ-षण्मुखी, मिथुन -चारमुखी, कर्क-दोनमुखी, सिंह-एकमुखी,  बारामुखी ,कन्या -चारमुखी, तुला-षण्मुखी, वृश्चिक-त्रिमुखी, धनु-पाचमुखी, मकर-सातमुखी, कुंभ -सातमुखी, मीन- पाचमुखी सर्व साधारण हे प्रचलित आहेत..

information of rudraksha

information of rudraksha in marathi

rudraksha benefits

power of rudraksha

rudraksha mala benefits

power of rudraksha beads

rudraksha benefits in how many days

is rudraksha really effective

how to increase rudraksha power

information of rudraksha in marathi

7 mukhi rudraksha benefits

3 mukhi rudraksha benefits in hindi

ek mukhi rudraksha

6 mukhi rudraksha benefits in hindi

2 mukhi rudraksha benefits in hindi

13 mukhi rudraksha benefits in hindi

4 mukhi rudraksha benefits in hindi

7 mukhi rudraksha benefits in hindi

No comments:

Post a Comment