Friday, April 22, 2016

Charanamrit the holy water

Charanamrit the holy water

प्रत्येक मंदिरात मिळते सुख-समृद्धी प्राप्त करून देणारी ही चमत्कारिक गोष्ट

देवी-देवतांची पूजा, आरती झाल्यानंतर देवाचे चरणामृत दिले जाते. चरणामृत शब्दाचा अर्थ म्हणजे देवाच्या चरणापासून प्राप्त झालेले अमृत. हिंदू धर्मात चरणामृत खूप पवित्र मानले जाते. चरणामृताचे सेवन अमृत समान मानले गेले आहे.

गोस्वामी तुलसीदास द्वारा रचित श्रीरामचरितमानसनुसार जेव्हा श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाने अयोध्येतून वनवासासाठी प्रस्थान केले तेव्हा त्यांची भेट एका नावाड्याशी झाली. नावाड्याने श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाल आपल्या नावेतून गंगा नदी पार करून दिली.

पद पखारि जलुपान करि आपु सहित परिवार।
पितर पारु प्रभुहि पुनि मुदित गयउ लेइ पार।।

अर्थ - श्रीरीरामाचे चरण धुवून ते चरणामृताच्या रूपात स्वीकारून नावाड्याने स्वत:ची भव-बाधेतून सुटका करून घेतली. त्याचबरोबर आपल्या पूर्वजांचेही कल्याण केले.

चरणामृताला केवळ धार्मिक दृष्टीनेच महत्त्व आहे असे नाही. वैज्ञानिक दृष्टीनेही चरणामृताचे महत्त्व आहे. चरणामृत तांब्याच्या पात्रात ठेवले जाते. त्यात तुळशीची पाने टाकतात. तांब्याच्या पात्रातील पाणी औषधी असते. तुळसदेखील औषधी वनस्पती आहे. त्यामुळे चरणामृतात अनेक रोग नष्ट करण्याची शक्ती आहे.

रणवीर भक्तिरत्नाकरमध्ये चरणामृताचा महिमा सांगण्यात आले आहे.

पापव्याधिविनाशार्थं विष्णुपादोदकौषधम्।
तुलसीदलसम्मिश्रं जलं सर्षपमात्रकम्।।

अर्थ - पाप आणि रोग दूर करण्यासाठी देवाचे चरणामृत औषधासमान आहे. यामध्ये तुळशीचे पान टाकल्यास चरणामृताच्या औषधी गुणांमध्ये अधिक वृद्धी होते.

अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनम्।
विष्णो: पादोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते ।।
अर्थ : चरणामृताने अकाळी मृत्यू येत नाही. देवाच्या चरणाचे अमृतरूपी जल समस्त पाप व्याधिंचे शमन करणारे आहे. भगवान विष्णुंच्या चरणाचे चरणामृत सेवन केल्यास पुनर्जन्म होत नाही.


पंचामृत कशाला म्हणतात...charanamrit recipe in hindi
पंचामृतामध्ये दूध, दही, तूप, साखर व मधाचा वापर करतात. यामध्ये थोडी तुळशीची पानेसुद्धा टाकतात. या पंचामृताचा उपयोग पूजेसाठी केला जातो. पंचामृतामधील ही पाच द्रव्ये काही विशिष्ट गोष्टींचे प्रतिनिधित्व करतात. दूध शुद्धतेचे द्योतक आहे तर दही भरभराट दर्शवते. साखरेमुळे सुख व आनंद, मधामुळे एकी तर तूप विजयाचे द्योतक आहे. अशा या स‌र्व गोष्टींनी युक्त हे पाच पदार्थ एकत्र आल्याने त्याला पंचामृत म्हणतात. पंचामृत ग्रहण केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते.

रणवीर भक्तिरत्नाकरमध्ये चरणामृताचा महिमा सांगण्यात आले आहे.

पापव्याधिविनाशार्थं विष्णुपादोदकौषधम्।
तुलसीदलसम्मिश्रं जलं सर्षपमात्रकम्।।

अर्थ - पाप आणि रोग दूर करण्यासाठी देवाचे चरणामृत औषधासमान आहे. यामध्ये तुळशीचे पान टाकल्यास चरणामृताच्या औषधी गुणांमध्ये अधिक वृद्धी होते.


वैज्ञानिक महत्त्व
चरणामृताला केवळ धार्मिक दृष्टीनेच महत्त्व आहे असे नाही. वैज्ञानिक दृष्टीनेही चरणामृताचे महत्त्व आहे. आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात विविध रोग नष्ट करण्याची शक्ती असते आणि यामधील पाण्यात ती येते. चरणामृत तांब्याच्या पात्रात ठेवले जाते. त्यात तुळशीची पाने टाकतात. तांब्याच्या पात्रातील पाणी औषधीसमान असते. तुळसदेखील औषधी वनस्पती आहे. त्यामुळे चरणामृतात अनेक रोग नष्ट करण्याची शक्ती निर्माण होते.

A 100% pure solid brass panchpatra and pali set (also called charan amrit set) is an integral part of poojas where in the holy charan amrit is placed before the pooja and then distributed upon the Pooja's completion.
The Charanamrit literally means Amrit (Holy Nectar) from the Charan (Feet of the Lord) of the worshipped Deity and is partaken as a sacred offering or a holy gift after the completion of the Pooja. In many Hindu homes the cooked food is first offered to the Lord each day and is then consumed by everyone else. The offered food is mixed with the rest of the food and then served as prasad.

Although you can prepare numerous kinds of Charanamrit but the most pure Charanamrit is traditionally considered to be a thoughtful mixture of the five essential elements - ghee (clarified butter), water (preferably water from the Ganga), curd, honey and tulsi leaves. This pious combination of the five primary elements is the Holy Charanamrit and is then offered from the Panchpatra & Pali Set to everyone in the home at the end of your daily worship or any other festive Pooja. 


charanamrit

charnamrit recipe

charanamrit recipe

charanamrit recipe in hindi

charanamrit meaning

charanamrit the holy water

panchamrit

No comments:

Post a Comment